कांदलगाव येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न

इंदापूर : तालुक्यातील कांदलगाव येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे प्रवीण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास कांदलगाव व परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली. सोनाई परिवाराचे संचालक अतुल माने यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन पार पडले. कांदलगाव येथील दत्त मंदिरात सकाळी दहा ते पाच या वेळेत ६५३ ग्रामस्थांनी नेत्र तपासणी…

Read More

अंकिता पाटील ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; महिलांची उपस्थिती लक्षणीय

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवा नेत्या व माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेला तिसऱ्या दिवशी ही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांची ही उपस्थिती लक्षणीय आहे. रविवारी व्याहळी येथून त्यांच्या जनसंवाद यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर आत्तापर्यंत अंकिता पाटील या कडबनवाडी, वैदवाडी,शेळगाव,गोतोंडी,कडबनवाडी,निमगाव केतकी, नरुटवाडी,कालठण नं.२ शिरसोडी, पेटकरवस्ती,चिंदादेवी, पिंपरी,सुगाव,अजोती,पडस्थळ,माळवाडी नं.१,माळवाडी…

Read More

बाळासाहेब सरवदे रिपाइंच्या तालुकाध्यक्षपदी कायम

इंदापूर : अवघ्या चोवीस तासात घडामोडी होवून बाळासाहेब सरवदे रिपाइंच्या तालुकाध्यक्षपदावर कायम राहिले आहेत. रिपाइंचे पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी शनिवारी बाळासाहेब सरवदे यांना पदावरून बरखास्त करुन शिवाजीराव मखरे यांच्याकडे तालुकाध्यक्ष पद सोपवण्यात येत असल्याचे पत्राद्वारे जाहिर केले होते.क्रियाशील सभासद न करणे.हे बरखास्तीचे वरकरणी दिसणारे एक कारण होते.मात्र जिल्हाध्यक्षांच्या सूचनांचे पालन न केल्याचा मुद्दा स्वतःच्या…

Read More

जंक्शन एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला : आ.दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूर : प्रस्तावित ‘जंक्शन एमआयडीसी’ साठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील १३१ हेक्टर ५० आर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला हस्तांतरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती आ.दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांना दिली. या निर्णयामुळे १३५ हेक्टर क्षेत्रावर नवीन महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीस प्राथमिक स्तरावर मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

Read More

तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला कॉंग्रेस पक्षाचा विरोध : आबासाहेब निंबाळकर

इंदापूर : इंदापूरातील कॉंग्रेस भवनच्या इमारतीचा ताबा कॉंग्रेस पक्षाला दिला जात नाही तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांच्या महाविकास आघाडीतील उमेदवारीला कॉंग्रेस पक्षाचा विरोध राहील, अशी भूमिका तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांनी सोमवारी (दि.१४) इंदापूरात झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली. शासकीय विश्रामगृहात ही पत्रकार परिषद झाली.कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जकीरभाई काझी,तालुका उपाध्यक्ष दिलीप सोनवणे,शहराध्यक्ष चमनभाई बागवान,निवास शेळके,…

Read More