ज्युदो स्पर्धेत श्रावणी शिताप सुवर्णपदकाची मानकरी

ज्युदो स्पर्धेत श्रावणी शिताप सुवर्णपदकाची मानकरी

 

इंदापूर : मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे झालेल्या दक्षिण-पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ ज्युदो स्पर्धेत ५२ किलो वजन गटात श्रावणी शिताप हिने सुवर्णपदक पटकावले आहे. अमृतसर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे
श्रावणी शिताप ही इंदापूरचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप यांची कन्या आहे. श्री छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजची विद्यार्थिनी असणा-या श्रावणीने या स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून सहभाग घेतला होता.सध्या ती गोवा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे कुलविंदर कौर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युदोचा सराव करत आहे. यापूर्वी कुराश क्रीडा प्रकारात श्रावणीने दोन राष्ट्रीय स्तरावरील पदके मिळवली होती. तिच्या यशाबद्दल कृषीी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तिचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *