चार वर्षे उलटून गेली तरी पालखीमार्गाचे काम अपूर्ण वारकऱ्यांची वाट अजून ही बिकटच

  शैलेश काटे इंदापूर : पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्याचा, त्याचे दर्शन घेण्याचा ध्यास घेतलेल्या वारकऱ्यांचा पायी जाण्याचा मार्ग प्रशस्त व्हावा, त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी सणसर पासून सराटी पर्यंतच्या चौपदरी पालखीमार्ग तयार करण्याचा घाट घातला गेला. २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात सुरु झालेल्या या प्रकल्पाचे काम २०२५ चे पाच महिने उलटून गेले तरी ही पूर्ण झालेले नाही. पालखीमार्गाचे…

Read More

बाबीर देवाच्या दर्शनाने प्रेरणादायी ऊर्जा मिळते : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : लहानपणापासून प्रत्येक वर्षी यात्रेला येऊन बाबीर देवाचे आशीर्वाद घेतो. आहे. बाबीर देवाच्या दर्शनाने प्रेरणादायी ऊर्जा मिळते,अशी प्रांजळ भावना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. रुई येथे भरलेल्या बाबीर देवाच्या यात्रेच्या निमित्ताने पाटील यांनी सोमवारी बाबीर देवाचे दर्शन घेतले.पुजा केली. आशीर्वाद मागितले.राज्यभरातून आलेल्या भाविकांशी संवाद साधला.त्यांच्या उपस्थितीत गजढोल वाजवण्याचा आनंद ही घेतला.वर्षानुवर्षे साज-या…

Read More

लेकीचे औक्षण करुन केले लक्ष्मी पूजन साजरे

इंदापूर : आपल्या लेकीचे औक्षण करुन लक्ष्मी पूजन साजरे करण्याचा अनोखा पायंडा जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्याच्या संघटक प्रा.जयश्री भास्कर गटकुळ यांनी पाडला आहे. घरातील महिला या सौभाग्य लक्ष्मी आहेत.त्यामुळे मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मातीच्या मूर्तीचे पूजन करण्याऐवजी घरातील लेकी सुनांचे पूजन करण्याचे आवाहन प्रा.गटकूळ यांनी केले आहे. त्या म्हणाल्या की,विज्ञानवादी दृष्टिकोन वाढीस लागावा…

Read More

हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी दीपावली निमित्त नागरिकांची अलोट गर्दी

इंदापूर :प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निमंत्रणाचा मान ठेवत दीपावली फराळ स्नेह कार्यक्रमास असंख्य नागरिक,विविध क्षेत्रातील नामवंतांनी उपस्थिती लावली.इंदापूरातील भाग्यश्री निवासस्थानी उत्साही वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. हर्षवर्धन पाटील,भाग्यश्री पाटील व कुटुंबीयांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तुतारीच्या मंगलमय आवाजाने वातावरण प्रफुल्लित झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हर्षवर्धन पाटील यांनी मनोगत व्यक्त…

Read More

साड्या नको विकास हवा म्हणत आमदारांकडून आलेल्या साड्या रस्त्यावर फेकल्या ; घोडकेवस्तीवरील संतप्त महिलांची कृती

इंदापूर : साड्यांचे आमीर दाखवून तुम्ही मते मागता आहात. विकास कुठे आहे अशी बिनतोड विचारणा करत कळंब गावच्या हद्दीतील महिलांनी आ. दत्तात्रय भरणे यांच्या मार्फत देण्यात आलेल्या साड्या रस्त्यांवर फेकून दिल्या. आम्हाला साड्या नको विकास हवा आहे अशी मागणी केली आहे. मागील दोन आठवड्यापासून इंदापूर तालुक्यात गावागावातील प्रत्येक घरात आ.दत्तात्रय भरणे यांचे सस्मित छायाचित्र असणा-या…

Read More

विविध उपक्रमाद्वारे दादासाहेब सोनवणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

इंदापूर : मुलांना मिठाई वाटप, रुग्णांना फळेवाटप, वृक्षारोपण, रुग्णांना फळेवाटप आदि उपक्रमाद्वारे माजी नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांचा ४७ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने इंदापूरात श्रीराम मंदिर येथील श्रावणबाळ अनाथ आश्रमातील मुला-मुलींना मिठाई वाटप करण्यात आले. उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.ज्योतिबाच्या माळानजीकच्या…

Read More

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी सुभाष खरे

इंदापूर : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी सुभाष खरे यांची निवड करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली,पुणे जिल्हा पूर्वचे निरीक्षक जावेदभाई मोमीन व जिल्हाध्यक्ष अमित गडदे यांनी ही निवड केली आहे. मुंबई प्रदेश सचिव सुनील लोखंडे,जिल्हा…

Read More

कांदलगाव येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न

इंदापूर : तालुक्यातील कांदलगाव येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे प्रवीण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास कांदलगाव व परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली. सोनाई परिवाराचे संचालक अतुल माने यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन पार पडले. कांदलगाव येथील दत्त मंदिरात सकाळी दहा ते पाच या वेळेत ६५३ ग्रामस्थांनी नेत्र तपासणी…

Read More