वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी सुभाष खरे

इंदापूर : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी सुभाष खरे यांची निवड करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली,पुणे जिल्हा पूर्वचे निरीक्षक जावेदभाई मोमीन व जिल्हाध्यक्ष अमित गडदे यांनी ही निवड केली आहे. मुंबई प्रदेश सचिव सुनील लोखंडे,जिल्हा निरीक्षक, जिल्हाध्यक्ष अमित गडदे यांच्या हस्ते पुणे येथे सुभाष खरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारा सुभाष खरे हे प्रकाश आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू व कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत.तालुका व शहरात असणारा मित्रपरिवार व दांडगा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.त्यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीची इंदापूर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी असताना,शहरासह तालुक्यात वंचित आघाडीच्या शाखा सुरु करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.विविध सामाजिक प्रश्नांवर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आंदोलने उभारली.त्यांच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडवलेल्या आहेत.

●● राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून’वंचित बहुजन माथाडी’च्या माध्यमातून इंदापूर तालुका व शहरातील कामगारांचे प्रश्न व विविध अडचणी सोडवण्याबरोबरच वंचित बहुजन आघाडी पक्ष वाढीसाठी आपण भरीव प्रयत्न करणार असल्याचे सुभाष खरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.●●

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *