राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळात हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती

इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवरुन तालुक्यात सुरु असणा-या राजकीय उलथापालथीच्या पार्श्‍वभूमीवर एक पाऊल पुढे टाकत पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी ( दि. १८) हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये नियुक्ती केली आहे.पाटील यांच्या उमेदवारीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब करत जयंत पाटील यांनी पक्षाचा इरादा स्पष्ट केला आहे.

पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे नियुक्तीपत्र सोपवले आहे.शनिवारी(दि.१९) मुंबईत होत असणाऱ्य पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीचे ही निमंत्रण दिले आहे.

या नियुक्तीमुळे विधानसभेच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेले तिसऱ्या आघाडीचे नेते कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *