इंदापूर पोलीसांची खणखणीत हॅटट्रिक ●तीन दिवसात सराईत सोनेचोर पकडला● ●तलवार दाखवून दहशत माजवणारावर गुन्हा दाखल● ●तहसीलदार हल्ला प्रकरणातील फरारी आरोपीस अटक●

इंदापूर : सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करुन दोन वेळा सोने चोरी करणा-या सराईत चोराला गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तीन दिवसात जेरबंद करण्याची कामगिरी इंदापूर पोलीसांनी केली आहे.

विठ्ठल रामचंद्र सानप (रा.संभाजीनगर) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे.सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याने मंगळवारी (दि.१५) येथील राजे ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात जावून हातचलाखी करुन दोन वेळा सोन्याची चोरी केली होती.या गुन्हूयात त्याला शिताफीने अटक करुन त्याने चोरलेला सोन्याची अंगठी व डोरले असा ३६ हजार रुपयाचा मुददेमाल इंदापूर पोलीसांनी हस्तगत केला आहे.

●● आचार संहिता लागू झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.या पार्श्‍वभूमीवर तलवार हातात घेवून फोटो काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या निखिल उर्फ लाला गणपत शिंदे (रा.पळसदेव) इसमास सापळा रचून पकडून इंदापूर पोलीसांनी त्याच्याकडून तलवार जप्त केली. गु.र.नं.८५८/२०२४ शस्त्र अधिनियम कलम ४, २५ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला.या कामी पोलीस शिपाई तुषार चव्हाण यांनी चमकदार कामगिरी केली. सहायक पोलीस फौजदार प्रकाश माने अधिक तपास करत आहेत. ●●

●● बदलून गेलेले तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील हल्ला प्रकरणातील फरारी आरोपी पांडुरंग बाबूराव देवकर (रा.बेडसिंग ता.इंदापूर) यास आज इंदापूर पोलीसांनी अटक केली.●●

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माने,हवालदार सलमान खान,पोलीस अंमलदार गणेश डेरे,विशाल चौधर,तुषार चव्हाण, अंकुश माने,नंदु जाधव,प्रवीण शिंगाडे यांनी ही कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *