इंदापूर : मुलांना मिठाई वाटप, रुग्णांना फळेवाटप, वृक्षारोपण, रुग्णांना फळेवाटप आदि उपक्रमाद्वारे माजी नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांचा ४७ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने इंदापूरात श्रीराम मंदिर येथील श्रावणबाळ अनाथ आश्रमातील मुला-मुलींना मिठाई वाटप करण्यात आले. उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.ज्योतिबाच्या माळानजीकच्या स्मशानभूमीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राऊत, रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे,माजी नगरसेवक सुधीर मखरे,अशोक मखरे,डॉ.मिलिंद खाडे,डॉ.विनोद राजपुरे,डॉ. अमोल ऊन्हाळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे इंदापूर शहराध्यक्ष अहेमदरझा सय्यद,सामाजिक कार्यकर्ते धरमचंद लोढा,बाळासाहेब क्षीरसागर,बाळासाहेब अडसूळ, राजाभाऊ गुळीक,चंदू सोनवणे,मुकिंद शिंदे,अनिल चव्हाण, शिवाजी मखरे,सुनिल यादव,समीर दुधनकर,मिलन सोनवणे, अजय सोनवणे,समिर सोनवणे,ऋषी ढावरे,तुषार ढावरे, दिग्विजय सोनवणे,सागर सोनवणे,सुमित आरडे,रितेश भंडलकर आदि मान्यवर या उपक्रमांच्या वेळी उपस्थित होते.
विविध उपक्रमाद्वारे दादासाहेब सोनवणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
