इंदापूर : तालुक्यातील कांदलगाव येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे प्रवीण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास कांदलगाव व परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली.
सोनाई परिवाराचे संचालक अतुल माने यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन पार पडले. कांदलगाव येथील दत्त मंदिरात सकाळी दहा ते पाच या वेळेत ६५३ ग्रामस्थांनी नेत्र तपासणी करून घेतली.यातील ४०२ ग्रामस्थांना चष्मे वाटप करण्यात आले तर १० ग्रामस्थांवर भारती विद्यापीठ पुणे येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
साधू सरडे,नरेश कुंभार,सुरज काशीद,राजू जाधव,निलेश रंधवे,छगन बनसुडे,अंकुश दोरकर,डॉ.शरद शिर्के,डॉ.तमन्ना शेख,डॉ.संतोष रणवरे,डॉ शेख यांनी या कार्यक्रमाचे संयोजन व व्यवस्थापन पाहिले.
गणेश मोहिते,सनी बंडगर,पांडुरंग राखुंडे,साधू ननवरे, आप्पासाहेब राखुंडे,समाधान राखुंडे,बाळासाहेब हजारे,नवनाथ सरडे,वैभव गिरी,नवनाथ काशीद,साधू सरडे,राजू जाधव, बालाजी काशीद,नरेश कुंभार,विलास मोरे,अतुल जगताप, तुकाराम सुतार,समाधान मदने,निलेश राखुंडे,नामदेव राखुंडे, पप्पू ननवरे,प्रदीप सरडे,सिद्धू कोळी,निलेश रंधवे,महावीर सातव हे मान्यवर उपस्थित होते.
