अंकिता पाटील ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; महिलांची उपस्थिती लक्षणीय

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवा नेत्या व माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेला तिसऱ्या दिवशी ही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांची ही उपस्थिती लक्षणीय आहे.

रविवारी व्याहळी येथून त्यांच्या जनसंवाद यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर आत्तापर्यंत अंकिता पाटील या कडबनवाडी, वैदवाडी,शेळगाव,गोतोंडी,कडबनवाडी,निमगाव केतकी, नरुटवाडी,कालठण नं.२ शिरसोडी, पेटकरवस्ती,चिंदादेवी, पिंपरी,सुगाव,अजोती,पडस्थळ,माळवाडी नं.१,माळवाडी नं.२,लासुर्णे,बजरंगवाडी,वैदवाडी,परिटवाडी,चव्हाणवाडी तनपुरेवस्ती,चव्हाणवाडी,कर्दनवाडी,बंबाडवाडी,मोहितेवाडी या गावांपर्यंत जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने पोहोचल्या आहेत.

गेल्या दहा वर्षात विद्यमान लोकप्रतिनिधी शैक्षणिक क्षेत्र, युवकांच्या हातांना रोजगार मिळवून देणे यासह बहुतांशी क्षेत्रांमध्ये कसे अपयशी ठरले आहेत. इंदापूर तालुक्यात विकासाचे कोणते ही काम का झालेले नाही.केवळ मलिदा गँगमधील ठराविक लोकांचाच कसा विकास झाला आहे, हे लोकांना पटवून देत आहेत. विकासाची निकृष्ट कामे करणारी मलिदा गॅंग हटाव तालुका बचाव असे आवाहन त्या करत आहेत.

शरद पवार,खा.सुप्रिया सुळे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधिमंडळात पाठविण्याचे जे आवाहन केले आहे,त्यास जनतेने साथ द्यावी. त्यांच्यावर इंदापूर तालुक्याच्या विकासाची जबाबदारी सोपवावी, असे आवाहन ही त्या करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, तालुका महिलाध्यक्षा छाया पडसळकर आदिसह पक्षाचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते या जनसंवाद यात्रेत सक्रिय सहभागी झाले आहेत.या जनसंवाद यात्रेमुळे विद्यमान लोकप्रतिनिधींसमोर कडवे आव्हान उभा ठाकल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *