इंदापूर : अवघ्या चोवीस तासात घडामोडी होवून बाळासाहेब सरवदे रिपाइंच्या तालुकाध्यक्षपदावर कायम राहिले आहेत.
रिपाइंचे पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी शनिवारी बाळासाहेब सरवदे यांना पदावरून बरखास्त करुन शिवाजीराव मखरे यांच्याकडे तालुकाध्यक्ष पद सोपवण्यात येत असल्याचे पत्राद्वारे जाहिर केले होते.क्रियाशील सभासद न करणे.हे बरखास्तीचे वरकरणी दिसणारे एक कारण होते.मात्र जिल्हाध्यक्षांच्या सूचनांचे पालन न केल्याचा मुद्दा स्वतःच्या प्रतिष्ठेचा करुन कदम यांनी सरवदे यांची बरखास्ती केली असल्याचे कदम यांनी जारी केलेल्या पत्रावरुन स्पष्ट दिसत होते. इंदापूर तालुकाध्यक्षासह पुरंदरचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांना ही कदम यांनी बरखास्त केले होते.
दरम्यान सोमवारी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले,महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे,पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे,पुणे जिल्हा प्रभारी विक्रम शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे झालेल्या पक्षाच्या बैठकी दरम्यान या प्रकरणाला तोंड फुटले. आठवले यांच्या आदेशानुसार बाळासाहेब सरवदे व पंकज धिवार यांच्या नियुक्त्या कायम ठेवण्यात आल्या आहेत.
बाळासाहेब सरवदे रिपाइंच्या तालुकाध्यक्षपदी कायम
