फक्त पाच वर्षांची संधी द्या.तुमचा सेवक म्हणून सेवा करेन : प्रवीण माने
इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांना वीस, दत्तात्रय भरणे यांना दहा वर्षांची संधी दिलीत मला पाच वर्षे काम करण्याची संधी द्या तुमचा सेवक म्हणून मी सेवा करेन,असे आवाहन इंदापूर विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी केले. आपल्या प्रचारानिमित्त रणगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. माने म्हणाले की,विधानसभेची निवडणूक ही जातीपातीची नव्हे…
