तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला कॉंग्रेस पक्षाचा विरोध : आबासाहेब निंबाळकर

इंदापूर : इंदापूरातील कॉंग्रेस भवनच्या इमारतीचा ताबा कॉंग्रेस पक्षाला दिला जात नाही तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांच्या महाविकास आघाडीतील उमेदवारीला कॉंग्रेस पक्षाचा विरोध राहील, अशी भूमिका तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांनी सोमवारी (दि.१४) इंदापूरात झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली.
शासकीय विश्रामगृहात ही पत्रकार परिषद झाली.कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जकीरभाई काझी,तालुका उपाध्यक्ष दिलीप सोनवणे,शहराध्यक्ष चमनभाई बागवान,निवास शेळके, महिला तालुकाध्यक्षा शकुंतला विपट या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
निंबाळकर म्हणाले की,इंदापूर शहरातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत कॉंग्रेस पक्षाच्या मालकीची कॉंग्रेस भवनची इमारत आहे.हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून बरेच दिवस झाले मात्र त्यांनी या इमारतीचा ताबा सोडला नाही. काँग्रेस पक्ष तालुक्यात वाढावा अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी तालुक्याच्या गावाच्या ठिकाणी असणा-या या इमारतीचा ताबा पक्षाकडे असणे गरजेचे आहे.यासंदर्भात आम्ही आमची भूमिका पक्षाला कळवणार आहोत.वरिष्ठ योग्य तो निर्णय होईल.मात्र सद्यस्थितीत हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला आमचा विरोध असणार आहे,असे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *