बाबीर देवाच्या दर्शनाने प्रेरणादायी ऊर्जा मिळते : हर्षवर्धन पाटील
इंदापूर : लहानपणापासून प्रत्येक वर्षी यात्रेला येऊन बाबीर देवाचे आशीर्वाद घेतो. आहे. बाबीर देवाच्या दर्शनाने प्रेरणादायी ऊर्जा मिळते,अशी प्रांजळ भावना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. रुई येथे भरलेल्या बाबीर देवाच्या यात्रेच्या निमित्ताने पाटील यांनी सोमवारी बाबीर देवाचे दर्शन घेतले.पुजा केली. आशीर्वाद मागितले.राज्यभरातून आलेल्या भाविकांशी संवाद साधला.त्यांच्या उपस्थितीत गजढोल वाजवण्याचा आनंद ही घेतला.वर्षानुवर्षे साज-या…
