निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घेणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा शासनाचा आदेश
इंदापूर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्याविरुध्द विद्यापीठे व संबंधित संस्थांनी शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी असा आदेश महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालनालयाने आज ( दि.५ ) परिपत्रकाद्वारे दिला आहे. उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर…
