इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सदरची तपासणी तीन टप्प्यात उप कोषागार कार्यालय, इंदापूर येथे करण्यात येणार आहे.
या वेळापत्रकानुसार पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी,दुसरी १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.कल्याण पांढरे यांनी दिली आहे.
