इंदापूर : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने एम.गौतमी यांची इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती एम.गौतमी यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.कल्याण पांढरे यांच्या कार्यालयास भेट दिली.कामकाजाचा आढावा घेतला.
डॉ.पांढरे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात स्थापित करण्यात आलेल्या विविध कक्षांची,मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्व तयारीची माहिती दिली.विविध कक्षांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
● एम.गौतमी यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस,पुणे येथील कक्ष क्रमांक ए-२०४ असा आहे.दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांना त्यांची भेट घेता येईल. त्यांचा संपर्क क्रमांक ९०२१५०८३१७ असा आहे.दूरध्वनी क्रमांक ०२०- २९५२३३६६ असा आहे. ई-मेल पत्ता genobs.daund.indapur@gmail.com असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी नागनाथ कंजेरी हे काम पहात आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक ९५९५९९४४५५ असा आहे.●
एम.गौतमी इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक
