इंदापूर विधानसभा निवडणुकीत २४ उमेदवार निवडणूक रिंगणात : लढत तिरंगी होणार
इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा उमेदवारांनी माघार घेतली आहे. २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, महायुतीचे उमेदवार आ.दत्तात्रय भरणे व अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने या तिघांमध्ये तिरंगी लढत होईल हे स्पष्ट झाले आहे.
छाननीमध्ये ६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर इंदापूर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ३४ उमेदवारांचे अर्ज राहिले होते. त्यापैकी १० उमेदवारांनी माघार घेतली.
निवडणूक रिंगणात असणा-या उमेदवारांची नावे अशी : हर्षवर्धन शहाजीराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), आ.दत्तात्रय विठोबा भरणे(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), श्रीपती महादेव चव्हाण (बहुजन समाज पक्ष),अमोल शिवाजी देवकाते (मनसे),ॲड.गिरीश मदन पाटील (महाराष्ट्र विकास आघाडी),हनुमंत कोंडीबा मल्लाव (भुई),आकाश भाऊ पवार,
तानाजी उत्तम शिंगाडे (रासप),प्रवीण दशरथ माने (अपक्ष), अमोल आण्णा आटोळे,हर्षवर्धन गोपाळराव पाटील,अमोल अनिल रांधवण,अनुप अशोक आटोळे अनिरुध्द राजेंद्र मदने, ॲड.पांडुरंग संभाजी रायते,सुधीर अर्जुन पोळ,विकास भिमराव गायकवाड,जावेद बशीर शेख,भगवान बापू खारतोडे,ॲड. संजय बापू चंदनशिवे,किसन नारायण सांगवे,दत्तात्रय सोनबा भरणे,संभाजी मधुकर चव्हाण,भिमराव जगन्नाथ शिंदे
●● इंदापूर विधानसभा निवडणूकीतून माघार घेतलेले उमेदवार : भाऊराव राजाराम झेंडे,सविता भिमराव कडाळे,अंकिता हर्षवर्धन पाटील,कल्याणी सुजितकुमार वाघमोडे,हर्षवर्धन श्रीपती पाटील,बाळासो मारुती धापटे,ॲड.राहुल पोपट बंडगर, निशीकांत रजनीकांत तोरणे,शिवाजी दत्तु आरडे,सगाजी मोहन कांबळे.●●
