इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या आक्रमक भूमिकेमुळे नगरपरिषद प्रशासन नमले   बाजारक-यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून अहवाल मागवला  

शैलेश काटे. इंदापूर : इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या आक्रमक भूमिकेसमोर नमते घेत,नगरपरिषदेच्या प्रशासनाने,मंडई,आठवडा बाजारातील बाजारकरी व येणा-या गिऱ्हाईकांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून अहवाल मागितला आहे.     सविस्तर वृत्त असे की, इंदापूर शहरात रविवारी मोठा आठवडा बाजार भरतो.पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासून नगरपरिषदेच्या पाठीमागे व चाळीस फुटी रस्त्याच्या दुतर्फा, दर्गा मस्जिद चौकापर्यंत…

Read More

शिरसोडी ते कुगाव या नियोजित पुलाच्या भराव्याचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद ; रक्तपात झाला तरी बेहत्तर पण भरावा होवू देणार नसल्याचा केला निर्धार

  इंदापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असणा-या शिरसोडी ते कुगाव या नियोजित पुलाची संलग्न असणारा ४५० मीटरचा भरावा आजच्या घडीला शिरसोडीकरांच्या असंतोषाचे कारण बनला आहे. शिरसोडीच्या ग्रामस्थांनी सोमवारपासून त्या भराव्याचे काम बंद पाडले आहे. कसल्या ही परिस्थितीत हा भरावा आम्ही होवू देणार नाही. रक्तपात होण्याची,पोलीस ठाण्यात जाण्याची अथवा आत्महत्या पाळी आली तरी आमची…

Read More

कौठळीच्या योगेश चितारे याने मिळवली कोल्हापूर विद्यापीठाची भौतिकशास्त्रातील डॉक्टरेट

इंदापूर  : पाच वर्षांहून अधिक काळ अथक परिश्रम घेवून कौठळी (ता.इंदापूर) येथील योगेश चितारे या युवकाने भौतिकशास्त्रातील विषयामधील डॉक्टरेट मिळवली आहे. गरीब घरचा खस्ता घेवून शिकलेला योगेश आत्ता डॉ.योगेश चितारे म्हणून ओळखला जाणार आहे.     त्यासाठी त्याने कोल्हापूर विद्यापीठाकडे ‘सोल्युशन ग्रोथ ऑफ टंग्स्टन ऑक्साइड ऑन टू डिमेन्सिशनल टायटनेट अँड हेक्सानायोबेट नॅनोशिट फॉर फोटोकॅटॅलिटिक डाय…

Read More

इंदापूरच्या शेती सिंचनासाठी खडकवासला व निरा डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन आवर्तने : क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

  इंदापूर : इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात खडकवासला कालव्याला दोन व नीरा डाव्या कालव्याला दोन आवर्तने देण्याचा निर्णय काल (दि.१) झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे क्रीडा अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकाराःना दिली. ते म्हणाले की,पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या…

Read More

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दणका लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक महिला कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले

इंदापूर : रस्ता मागणीच्या निकालाची कागदपत्रे बनवून देण्यासाठी स्वतःसह ‘साहेबां’साठी मागितलेली २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तहसील कार्यालयील महसूल सहाय्यक महिला कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ( दि.२८) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले. कावेरी विजय खाडे ( वय ४८ वर्षे,रा.संघवीनगर,भिगवण रोड, बारामती) असे महिला कर्मचाऱ्यााचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक शिरीष…

Read More

किरकोळ कारणावरुन कोयत्याने हल्ला, दोघे जखमी हिंगणगावमधील घटना,१४ जणांवर गुन्हा दाखल 

  इंदापूर : अत्यंत किरकोळ कारणावरुन तरुणांच्या टोळक्याने दोघा भावांना कोयता,लोखंडी रॉड,बॅटने अमानुष मारहाण केल्याची घटना मंगळवारी ( दि.२५) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास हिंगणगाव येथे घडली. दोघे बंधू जखमी झाले आहेत. १४ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्निल जगताप, निखिल बगाडे,स्वप्निल बगाडे स्वयंम, समीर वाघमारे, प्रज्वल वाघमारे,रोहन भोसले, दीपक जगताप, प्रेम रणदिवे,अक्षय बापु आरडे,सूरज आरडे,धीरज…

Read More

किरकोळ कारणावरुन कोयत्याने हल्ला ; दोघे जखमी हिंगणगावमधील घटना१४ जणांवर गुन्हा दाखल 

  इंदापूर : अत्यंत किरकोळ कारणावरुन तरुणांच्या टोळक्याने दोघा भावांना कोयता,लोखंडी रॉड,बॅटने अमानुष मारहाण केल्याची घटना मंगळवारी ( दि.२५) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास हिंगणगाव येथे घडली. दोघे बंधू जखमी झाले आहेत. १४ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्निल जगताप, निखिल बगाडे,स्वप्निल बगाडे स्वयंम, समीर वाघमारे, प्रज्वल वाघमारे,रोहन भोसले,दीपक जगताप, प्रेम रणदिवे,अक्षय बापु आरडे,सूरज आरडे,धीरज पिंगळे,…

Read More

कत्तल करुन गोमांस विक्रीसाठी घेवून निघालेल्या पाच जणांवर गुन्हा दाखल ; साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त  इंदापूर पोलीसांची कारवाई

इंदापूर : कत्तल करुन दोन लाख रुपये किमतीचे एक हजार किलो गोमांस घेवून जाणा-या पाच जणांवर गुन्हा दाखल करुन इंदापूर पोलीसांनी त्यांच्याकडील गोमांस, गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने व इतर सुमारे ७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी ( दि.२५ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राजवडी गावच्या हद्दीत गायरान जागेत ही कारवाई करण्यात आली….

Read More

कर्मवीरांच्या प्रत्येक जयंतीदिनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा घेण्याचा ठराव एकमताने संमत

  इंदापूर : कर्मवीरांच्या प्रत्येक जयंतीदिनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा घेण्याचा ठराव,तब्बल ४४ वर्षानंतर स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या १९७९-८० मध्ये दहावीच्या तुकडीत असणा-या माजी विद्यार्थ्यांनी केला. या स्नेहमेळाव्यात रयतच्या कार्यात योगदान देणारे माजी विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल निवृत्त शिक्षकांना माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. आयएमएच्या डॉ.नितू मांडके सभागृहात…

Read More

सोमवारी इंदापूरात लोकशाही दिवसाचे आयोजन

इंदापूर : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका लोकशाही दिवस या उपक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.त्यानुसार येत्या सोमवारी ( दि.१७) इंदापूर तालुक्यात लोकशाही दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली आहे. ते म्हणाले की,सर्व शासकीय कार्यालयांकडे प्रलंबित असणारे नागरिकांचे प्रश्न,अडीअडचणी, समस्याचे निराकरण करण्यासाठी लोकशाही दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More