इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार,बावड्याचे भूमिपूत्र हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी खा.सुप्रिया सुळे शनिवारी ( दि.१६) बावडा येथे जाहीर सभा घेणार आहेत.खा.धैर्यशील मोहिते पाटील या सभेस उपस्थित रहाणार आहेत.
बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघातील बावडा हे गाव हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला आहे.राजकीयदृष्ट्या सजग असणा-या गावातील सभेला उच्चांकी गर्दी होणार आहे. सभेमध्ये खा.सुप्रिया सुळे,खा.धैर्यशील मोहिते पाटील काय बोलणार या कडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी खा. सुप्रिया सुळे शनिवारी बावड्यात
