शैलेश काटे

इंदापुरात रविवारपासून मालोजीराजे व्याख्यानमाला

इंदापूर : शहर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही रविवार (दि.१६) पासून तीन दिवसांच्या मालोजीराजे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.व्याखानमालेचे हे १६ वे वर्ष आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा इंदापूर नगर परिषदेचे गटनेते कैलास कदम व कार्याध्यक्ष सुनील गलांडे यांनी सांगितले की, रविवार ते मंगळवार या कालावधीत दररोज सायंकाळी सात…

Read More

अनेक भाषा आत्मसात केल्याने आपले व्यक्तिमत्व समृद्ध होते : मौलाना अब्दुल करीम मुशाहिदी

  इंदापूर : ‘भाषा ही कोणत्या जाती धर्माची मक्तेदारी नसते. देशविदेशात राज्यात आपण जातो.तिकडचे लोक ही ये-जा करत असतात.अशा वेळी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी अनेक भाषा बोलता येणे गरजेचे असते.अनेक भाषा आत्मसात केल्याने आपले व्यक्तिमत्व समृद्ध होते’,असे प्रतिपादन दर्गा मस्जिदचे मौलाना अब्दुल करीम मुशाहिदी यांनी केले. इंदापूर महावि‌द्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने उर्दू लिपी प्रशिक्षण वर्गाच्या उ‌द्घाटन…

Read More

ॲड. राहुल मखरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंदापूर शहर कडकडीत बंद 

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते ॲड.राहुल मखरे व ॲड. सूरज मखरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी विचारांच्या संघटनांनी पुकारलेल्या इंदापूर शहर बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार दुपारपर्यंत कडकडीत बंद होते. ॲड. राहुल मखरे व ॲड. सूरज मखरे यांना एका जुन्या प्रकरणात इंदापूर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन पोलीसांनी…

Read More

ठेकेदाराच्या बेपर्वाईमुळे वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची झाली दुरावस्था

ठेकेदाराच्या बेपर्वाईमुळे वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची झाली दुरावस्था इंदापूर : …वाढलेली वाळलेली काटेरी झुडुपे, धुळीच्या थराने माखलेले तडा गेलेले मावळ्यांचे पुतळे, उड्डाणपुलाच्या कामामुळे खचत चाललेला स्मारकालगतचा एक एक इंच…एकेकाळी आकर्षक व देखण्या दिसणा-या वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची सध्या अशी दुरावस्था झालेली आहे. स्मारकाची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल अशी हमी घेतलेल्या एन.पी.इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा….

Read More

आश्रमशाळेतील मुले फुलवत आहेत परसबाग

इंदापूर : ते सर्व विद्यार्थी दररोज एक तास परसबागेत श्रमदान करुन परसबाग फुलवत आहेत. स्वतःच्या हाताने पालेभाजांची लागवड करुन त्यांची जोपासना करत आहेत,तीच भाजी त्यांच्या ताटात असते.विद्यार्थी बदलतात,श्रमदानासाठी नवे हात येतात.गेल्या बारा वर्षांपासून अविरतपणे हे कार्य चालू आहेत. श्रमदानाची ही गाथा आहे,रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांची. ज्यांच्या घरी शिक्षण पोहोचलेच नव्हते,…

Read More

इंदापूर विधानसभेसाठी जिल्हात सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान

इंदापूर : दुपारनंतर मतदानाचा वेग वाढलेल्या इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान झाले आहे. ३ लाख ४१ हजार ४८५ मतदारांपैकी २ लाख ५९ हजार ८७१ मतदारांनी मतदान केले आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत ०.२४ टक्क्यांनी ‘टक्का’ घसरला असला तरी निवडून येणारा उमेदवार दोन ते तीन हजारांच्या मताधिक्यानेच निवडून येईल असा…

Read More

काम करण्याची संधी दिली तर पाच वर्षे तुमचा सेवक या नात्याने काम करेन : प्रवीण माने

इंदापूर : आपण दिलेल्या पाठबळावर मी विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली तर पाच वर्षे तुमचा सेवक या नात्याने काम करेन, अशी ग्वाही विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी प्रचाराच्या सांगता सभेत बोलताना आज ( दि.१८) दिली.प्रियदर्शिनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पटांगणात मोठ्या गर्दीत ही सभा झाली. या वेळी बोलताना…

Read More

हर्षवर्धन पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांचा विजय निश्चित : खा. सुप्रिया सुळे यांचा विश्वास

इंदापूर : हर्षवर्धनभाऊ तुम्ही थोरले भाऊ या नात्याने माझ्या पाठीशी उभे राहिलात.आज तुम्ही एकटे पडला नाहीत.धाकटी बहिण म्हणून मी तुमच्या सोबत आहे.सारे मतदार आपल्याबरोबर आहेत.तुमच्यासह महाविकास आघाडीच्या पुणे जिल्ह्यातील सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे,असा विश्वास खा.सुप्रिया सुळे यांनी बावडा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत शनिवारी (दि.१७) रात्री व्यक्त…

Read More

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी खा. सुप्रिया सुळे शनिवारी बावड्यात

इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार,बावड्याचे भूमिपूत्र हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी खा.सुप्रिया सुळे शनिवारी ( दि.१६) बावडा येथे जाहीर सभा घेणार आहेत.खा.धैर्यशील मोहिते पाटील या सभेस उपस्थित रहाणार आहेत. बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघातील बावडा हे गाव हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला आहे.राजकीयदृष्ट्या सजग असणा-या गावातील सभेला उच्चांकी गर्दी होणार आहे. सभेमध्ये खा.सुप्रिया…

Read More