धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण

इंदापूर : अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर हौसिंग सोसायटी जयंती महोत्सव समितीच्या वतीने सोसायटीच्या प्रांगणात भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष विलास मखरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
पांडुरंग व्यवहारे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे व लक्ष्मण मखरे यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीचे पूजन करण्यात आले.सामूहिक बुद्ध पूजा घेण्यात आली.शरद ओहोळ यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *