राष्ट्रीय कुराश स्पर्धेत इंदापूर अजित व्यवहारे भारतात तिसरा शैलेश काटे इंदापूर : हिमाचल प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणा-या इंदापूरच्या अजित व्यवहारे याने भारतात तिसरा क्रमांक मिळवला. गेल्या महिन्यात २८ तारखेला कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पुण्यात राज्यस्तरीय कुराश स्पर्धा झाली. त्यामध्ये इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट अकॅडमी व शहा हेल्थ क्लब इंदापूर येथे सराव करणा-या अजित व्यवहारे,कुणाल जाधव जगदीश तोंडे,मंगेश वाघमोडे व काजल जाधव या पाच खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवले. त्यांची हिमाचल प्रदेशात होणा-या राष्ट्रीय कुराण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्या राष्ट्रीय स्पर्धेत अजित व्यवहारे याने तिसरा क्रमांक मिळवला. कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष अंकुश नागर,सचिव शिवाजी साळुंखे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय व्यवहारे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. _______
