‘राज्यस्तरीय आदर्श समाजप्रबोधनकार पुरस्कारा’ने स्वाती लोंढे सन्मानित

शैलेश शं. काटे

इंदापूर : लेखिका स्वाती लोंढे यांना सोलापूर येथील सकल माळी समाज सेवा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय आदर्श समाजप्रबोधनकार पुरस्कार २०२५’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सोलापूर येथील समाजकल्याण भवनमध्ये झालेल्या झालेल्या शानदार सोहळ्यात,मोहोळचे नगराध्यक्ष तथा माळी समाजाचे नेते रमेश बारस्कर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. देण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना लोंढे म्हणाल्या की, सर्वच महापुरूषांनी समाजपरिवर्तनाचे, मानवी हिताचे कार्य केले आहे,त्यांचे विचार समाजातील तळा-गाळातील लोकांपर्यंत पोहचवणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.पुरस्कारामुळे प्रेरणा मिळाली आहे.पुढील काळात अधिक जोमाने महापुरूषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

सकल माळी समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग येळवे, उपाध्यक्ष प्रा.भानुदास बनसोडे,सचिव संतोष गायकवाड, संस्थेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.प्रथमेश कासार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.भानुदास बनसोडे यांनी आभार मानले.

________________________________________

 

●● सामाजिक प्रबोधनपर लेखन, काव्यरचना, व्याख्याने ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यासाठी स्वाती लोंढे यांना पुरस्कार दिल्याचे सकल माळी समाज सेवा संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले. ●●

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *