कौठळीच्या योगेश चितारे याने मिळवली कोल्हापूर विद्यापीठाची भौतिकशास्त्रातील डॉक्टरेट
इंदापूर : पाच वर्षांहून अधिक काळ अथक परिश्रम घेवून कौठळी (ता.इंदापूर) येथील योगेश चितारे या युवकाने भौतिकशास्त्रातील विषयामधील डॉक्टरेट मिळवली आहे. गरीब घरचा खस्ता घेवून शिकलेला योगेश आत्ता डॉ.योगेश चितारे म्हणून ओळखला जाणार आहे. त्यासाठी त्याने कोल्हापूर विद्यापीठाकडे ‘सोल्युशन ग्रोथ ऑफ टंग्स्टन ऑक्साइड ऑन टू डिमेन्सिशनल टायटनेट अँड हेक्सानायोबेट नॅनोशिट फॉर फोटोकॅटॅलिटिक डाय…
