इंदापूर : माजी राज्यमंत्री, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे इंदापूरकरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
यंदाच्या रमजान रोजाच्या दरम्यान दि.८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दर्गाह मस्जिद चौकात आयोजित केलेल्या रोजा इफ्तार पार्टीच्या वेळी सिद्दीकी हे पुत्र आ.झिशान सिद्दीकी यांच्यासमवेत इंदापूरला आले होते.आ.दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर त्यांनी ही आपल्या छोटेखानी भाषणात सणाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात त्यांचा अकल्पित व दुर्दैवी मृत्यू झाला याची हळहळ लागून राहिल्याचे आज दिसत होते.

